अब्दू रोजिकचा जन्म  23 सप्टेंबर 2003 रोजी ताजिकिस्तान गिशदारवा गावात झाला

14 November 2023

Created By: Chetan Patil

एकेकाळी अब्दू गावच्या बाजारात रस्त्यावर गाणी गायचा

गिशदारवाच्या रस्त्यावर गात असताना ताजिक ब्लॉगर-रॅपर बॅरन याची नजर अब्दूवर पडली

रॅपर बॅरनने अब्दूच्या वडिलांची भेट घेतली. त्याने अब्दूला आपल्यासोबत दुबईला पाठवण्याची विनंती केली

अब्दूच्या वडिलांनी रॅपर बॅरन याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला दुबईत घेऊन जाण्याची परवानगी दिली

 बॅरन अब्दूला आर्थिक मदत करायचा. हळूहळू बॅरनने अब्दूला गायला शिकवलं.

अब्दूने ताजिक भाषेत गाणी गायली. तो अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आला.

तेव्हापासून अब्दूने मागे वळून कधीच पाहिलं नाही. तो यशाच्या उंच शिखरावर चढत गेला