वयाच्या 60व्या वर्षी गोविंदा पुन्हा लग्नाच्या बेडीत

21 March 2024

Created By : Manasi Mande

अभिनेता गोविंदा त्याची पत्नी सुनीता हिच्यासह एखाद्या रिॲलिटी शोमध्ये आला की धमाल करतो. नुकतेच ते दोघे डान्स दीवाने 4 च्या सेटवर आले होते.

डान्स शोमध्ये गोविंदा आणि सुनीताने पुन्हा लग्न केलं, एकमेकांच्या गळ्यात वरमालाही घातल्या. याचं सगळं क्रेडिट जातं माधुरी दीक्षितला..

गोविंदाजी, तुमचं लग्न कधी झालं, कळलंच नाही, असं म्हणत माधुरीने हळहळ व्यक्त केली.

आमच्या लग्नाचा एकही फोटो नाही असं सांगत सुनीता यांनीही दु:ख व्यक्त केलं. ते ऐकताच माधुरीने त्या दोघांच लग्न लावण्याचा निर्णय जाहीर केलं.

फोटो नाहीत तर काय झालं ? डान्स दीवानेचं कुटुंब आहे ना. आज आम्ही तुमचं लग्न लावून देऊ, असं माधुरी म्हणाली.

त्यानंतर डान्स दीवानेच्या सेटवरच गोविंदा -सुनीता यांनी एकमेकांना वरमाला घातल्या. त्यांच पुन्हा एकदा लग्न लागलं.

या जोडप्याने ट्विनिंग करत गुलाबी रंगाचे कपडे घातले. त्यांची जोडी सुंदर दिसत होती. चाहत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

हा प्रोमो पाहून चाहते हा संपूर्ण एपिसोड बघण्यासाठीही खूप उत्सुक आहेत.