पोट आत घ्यायला विसरला की काय ? सलमान खान ट्रोल

6 February 2024

Created By : Manasi Mande

सलमान खान त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेक अभिनेत्यांना ट्रेनिंगही दिलं.

पण सलमानने फिटनेसकडे लक्ष देणं बंद केलं की काय असं  त्याचे नवे फोटो पाहून चाहत्यांना वाटतंय.

त्या फोटोत त्याचं पोट सुटलेलं दिसतंय, ज्यामुळे सलमान खूप ट्रोल होतोय. युजर्सची त्याची खेचत आहेत.

प्रोड्युसर राधिका काबरा नुकतीच सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी पोहोचली. तिने सलीम खान आणि सलमानची भेट घेतली.

तिने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एका फोटोत ती सलीम खान यांच्यासोबत होती, तर मागे सलमान फोटो बॉम्बिंग करताना दिसला.

या फोटोत सलमान कॅप, बनियान आणि ट्रॅक पँट्स अशा कॅज्युअल अवतारात होता, मात्र त्याचं पोट सुटलेलं दिसलं.

हे पाहून युजर्सनी सलमानला ट्रोल केलं. ' प्रत्येक फोटोत पोट आत घेणं किती कठीण आहे, ' अशा कमेंट्स काहींनी लिहील्या.

भाईला पोट आत घ्यायला वेळच नाही मिळाला. आता घरात पण श्वास रोखून चालावं लागणार की काय ? असा विचार सलमान करतोय, अशा कमेंट्सही होत्या.