आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत काजोलचा झगामगा लूक

22  December 2023

Created By : Manasi Mande

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हेही पार्टीसाठी उपस्थित होते.

काजोलच्या शिमरी साडीने सर्वांचं लक्ष वेधलं, त्यावर अनेकांनी भरपूर कमेंट्सही केल्या.

दबंग स्टार सलमान खाननेही पार्टीला हजेरी लावत आनंद पंडित यांना शुभेच्छा दिल्या.

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नीसह पार्टीला हजेरी लावली.

अभिनेता शर्मन जोशीही बऱ्याच काळानंतर दिसला.

विख्यात चित्रपट दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तानही या पार्टीसाठी आवर्जून उपस्थित होते.

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल मल्लिका शेरावतने लाल ड्रेसमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं .