या स्टारकिड्सचे 2023 मध्ये झाले धडाक्यात पदार्पण

21  December 2023

Created By : Manasi Mande

किंग खान शाहरूख याची लेक सुहाना खानने 'द आर्चीज' मधून डेब्यू केले.

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिकसवर  7  डिसेंबरला हा पिक्चर रिलीज झाला.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक हिनेही यावर्षी डेब्यू केलं.

सलमान खानच्या  'किसी का भाई किसी की जान'मधून तिचं मोठ्या पडद्यावर पदार्पण झालं.

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानेही 'द आर्चीज' मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत सर्वांचं लक्ष वेधलं.

सलमान खानची भाची अलीजे हीने मामाच्या पावलावर पाऊल ठेवत  'फर्रे' मधून डेब्यू केला. पण हा चित्रपट फारसा चालला नाही.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हिनेही 'द आर्चीज' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

खुशीची बहीण आणि श्रीदेवी यांची मोठी लेक जान्हवी कपूरने काही वर्षांपूर्वीच करण जोहरच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.