रणबीरच्या 'ॲनिमल'चं पाकिस्तान कनेक्शन काय ?

12 December 2023

Created By : Manasi Mande

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर जबरी कमाई केली आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका, तृप्ती डिमरीसह एक पाकिस्तानी चेहराही दिसला आहे.

तो चेहरा आहे शफीना शाह हिचा, तिने चित्रपटात बॉबी देओलच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका केली आहे.

शफीना ही एक अभिनेत्री आणि मॉडेलही आहे.

शफीनाचे वडील भारतीय तर आई पाकिस्तानी असून तिचा जन्म लंडनमध्ये झाला.

शफीना ही मिस पाकिस्तान वर्ल्ड 2023 चा खिताबही जिंकली. पुढल्या वर्षी ती मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.