तू मला बिनधास्त पकड, जवळ ये... अभिनेत्री थेट सांगायची !

 24 June 2025

Created By : Manasi Mande

करण मेहरा हा लोकप्रिय टीव्ही कलाकार आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है, या अनेक वर्ष चाललेल्या लोकप्रिय शोमध्ये करण आणि हिना खान मुख्य भूमिकेत होते.

शो नंतर त्याचं हिना खानशी बिनसल्याची चर्चा होती. मात्र करणने शोच्या सुरूवातीच्या काळातील आठवणी ताज्या केल्या आहेत.

रोमँटिक सीन्स करताना मला खूप लाजल्यासारखं व्हायचं, असं करणने सांगितलं.

ये रिश्ता... साठी मी 8 वर्ष काम केलं. दिग्दर्शकामुळे शो मध्ये माझी हिना खानसोबत उत्तम केमिस्ट्री होती.

आम्ही तेव्हा नवे होतो, मी 3-4 वर्ष काम केलं होतं, हिना तर अगदीच नवखी होती.

एकत्र कसं बसायचं, प्रेमाचे सीन असतील तर कसे करायचे ? हा प्रश्न होता. मी पहिल्यापासूनच लाजरा आहे.

ती ( हिना खान)  मला समजवायची - अरे घाबरू नकोस, तू मला बिनधास्त पकड, बिनधास्तपणे माझ्या जवळ ये... ती मला कम्फर्टेब करायची असं त्याने नमूद केलं.

मी म्हणायचो थोडं अजीब वाटतयं. 8 वर्ष मी ती मालिका केली. शेवटची 3-4 वर्ष तर मी आणि हिना कधीच रिहर्सल करायचो नाही.

हिना आणि करणने एकत्र काम सुरू केल्यावर त्यांच्या तणाव होता, असं बोललं जायचं पण त्या दोघांनी त्यावर कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही.