कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येथे जगभरातून अनेक सेलेब्रिटी हटके अंदाजात येतात, त्यात अनेक भारतीय सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने यावेळीही हजेरी लावली आहे. यंदाचा तिचा अंदाज खूप हटके होता, सध्या सगळीकडे तिचीच चर्चा आहे.
सोशल मीडियावर तिने काही फोटो शेअर केले. लाल साडी, भांगेत कुंकू ( सिंदूर) आणि साजेसे दागिने असा अदितीचा लूक पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.
या पेहरावात तिने समुद्रकिनारी फोटोशूटही केलं. ते चांगलच गाजत असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला.
त्यासह तिने ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमधीलही काही फोटो शेअर केलेत.
काळ्या रंगाचा, शिमर असलेला ड्रेस, सेट करून मोकळे सोडलेले केस आणि गळ्यातील डायमंड नेकलेस... आदितीचा हा लूक पाहून चाहते घायाळ झालेत.
तिचा एलिंगट लूक आणि सौंदर्य पाहून अनेकांनी तिच्या फोटोंवर लाईक्सची उधळण केली आहे.