गावच्या शेतात रमली अभिनेत्री, शेतात गेली, चिंचा काढल्या अन् रोडच्या कडेला झोका खेळत...

23 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावेने ‘अर्थ डे’निमित्त शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

करिअरच्या शिखरावर असताना लग्न करून अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी भावे अधूनमधून भारतात येत असते.

नुकताच तिने तिचा गावचा व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

शेतात फेरफटका मारणे, ऊसाचा रस काढणे, चिंच खाणे आणि वडाच्या झाडाच्या पारंब्यावर झोका घेणे असे साधे पण मनमोहक क्षण तिने अनुभवले.

अभिनेत्रीचा साधेपणा आणि निसर्गाशी जोडलेपण पाहून चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.