ऋतुजा बागवेचं 'फूडचं पाऊल'.. या अभिनेत्रीही बनल्या बिझनेसवुमन

28 July 2025

Created By : Manasi Mande

टीव्ही मालिकांमधून झळकलेली, लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे.

'फूडचं पाऊल'  तिच्या रेस्टॉरंटचं नुकतच उद्घाटन झालं. अभिनेता सुबोध भावे हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.

अंधेरी पूर्व, मरोळ परिसरात ऋतुजाचं हे नवं रेस्टॉरंट असून, त्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.

तुम्हा सर्वांच्या प्रेमावर विश्वास ठेवून, माझ्या माणसांना घेऊन, नव्या व्यवसायात पुढचं पाऊल टाकतेय… ‘फूडचं पाऊल - व्हेज- नॉनव्हेज रेस्टॅारंट असं तिने लिहीलंय.

ऋतुजाच्या या फोटो आणि व्हिडोवर शेकडो कमेंट्स, लाईक्स आल्या असून अनेकांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्यात.

ऋतुजाप्रमाणेच इतर अनेक अभिनेत्रींनीही व्यवसाय सुरू केला असून त्या बिझनेसवुमन बनल्या. त्यापैकीच एक म्हणजे अक्षया देवधर, तिने पुण्यात साड्यांचं दालन सुरू केलं.

चला हवा येऊ द्या फेम, श्रेया बुगडेने देखील काही महिन्यापूर्वी रेस्टॉरंट सुरू केलं.  ‘द फिश बिग कंपनी’ असं तिच्या दादरमधील रेस्टॉरंटचं नाव आहे.

मराठी अभिनेत्री मृणाल दुसानिसने पती नीरज मोरेबरोबर (Neeraj More) ठाण्यात ‘बेली लाफ्स’ हे नवं हॉटेल सुरू केलं.

तर लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा प्राजक्तराज या नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे, तसचे ती निर्मिती क्षेत्रात देखील उतरली.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने पुण्यात  ‘एम टू एम’ हे आलिशान सलोन सुरू केले आहे.