अदिती राव हैदरी-सिद्धार्थची एंगेजमेंट, अभिनेत्रीने शेअर केली गुड न्यूज

29 March 2024

Created By : Manasi Mande

अदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत लग्न केल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी उठल्या.

अदिती सिद्धार्थने 26 मार्चला तेलंगणमधील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती.  

दोघांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत ते लग्नबंधनात अडकले अशी चर्चा, मात्र त्या दोघांनीही अधिकृत घोषणा केली नव्हती. आता अदितीने शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. 

अदितीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला. त्या दोघांनी अद्याप लग्न न केल्याचंही तिने यातून स्पष्ट केलंय.

या फोटोत अदितीच्या बोटात डायमंड रिंग चमकताना दिसत्ये. तर सिद्धार्थच्या बोटातही साखरपुड्याची अंगठी दिसत्ये. 

अदिती-सिद्धार्थच्या साखरपुड्याची ही न्यूज ऐकून त्यांचे चाहते खूप खुश आहेत. सर्वांनी त्यांची पोस्ट लाइक करत अभिनंदनाचा वर्षाव केलाय.