अजय देवगणकडून पाकिस्तानचं कौतुक; म्हणाला, "मी त्यांचा आभारी...."

 6 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो.

अजय देवगणचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. 2007 मध्ये तो पाकिस्तानला गेला होता. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याचा 'ओंकारा' चित्रपटासाठी

त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय 'लेट नाईट विथ बेगम नवाजिश अली' या पाकिस्तानी चॅट शोमध्ये गेला होता. 

यावेळी त्याने चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली. 

खरंतर, अजय देवगणच्या ओंकारा चित्रपटाला पाकिस्तानमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता

या चॅटशोमध्ये अजय देवगण पाकिस्तानात पहिल्यांदाच आल्याचं त्याने सांगितलं होतं.

मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता की, "मी लोकांची प्रतिक्रिया आणि प्रतिसाद पाहिला. त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे"

अजयच्या फक्त ओंकारा चित्रपटालाच नाही तर त्यालाही पाकिस्तानात खूप प्रेम मिळाल्याचं त्याने सांगितलं होतं

तसेच तो म्हणाला होता की, पहिल्याच पाकिस्तान दौऱ्यात त्याला खूप खास वागणूक मिळाली, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता