राधिका-अनंतच्या लग्नापूर्वी इटलीत क्रूझवर शानदार सेलिब्रेशन,  300 VIP येणार

21 May 2024

Created By :  Manasi Mande

अनंत अबांनी राधिका मर्चंटचं लग्न काही महिन्यांवर आलं असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

29 मे ते 1 जून या काळात त्यांच्या लग्नाचं इटलीमध्ये सेलिब्रेशन इटलीमध्ये होणार असून एक शानदार पार्टी होईल.

खास पाहुणे 29 मे रोजी इटलीच्या सिसिली शहरात एका क्रूझवर चढतील. ते क्रूझ 1 जून ला स्वित्झर्लंडला पोहोचेल.

प्रायव्हसी राखण्यासाठी क्रूझवर नो फोन पॉलिसी लागू होईल. 'Futuristic Cruise'अशी या सेलिब्रेशनची थीम आहे.

मुकेश, नीता आणि आकाश अंबानी यांच्या व्यतिरिक्त इतर सदस्य हे पार्टीच्या तयारीसाठी लंडनमध्ये असल्याचे वृत्त आहे.

19 मे पासून याची तयारी सुरू झाली. जगभरातून 300 व्हीआयपी गेस्टना निमंत्रण देण्यात आलंय.

गेस्ट लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनम कपूर, आनंद अहुजा यांची नावं आहेत.

तसेच शाहरुख खान आणि फॅमिली, सलमान खान तसेच रणबीर-आलिया देखील येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

राधिका -अनंत यांचं लग्न मुंबईत 6-12 जुलैदरम्यान होऊ शकतं. त्यानंतर दिल्लीतही सेलिब्रेशन होणार असल्याचे वृत्त आहे.