औरंगजेबाची लाडकी लेक होती या हिंदू राजाच्या प्रेमात, अन् नंतर कृष्ण भक्त झाली

 6 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

छावा चित्रपटानंतर लोकं बऱ्याच गोष्टी सर्च करू लागले आहेत

छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी जास्त सर्च होताना दिसत आहेत

सोबतच औरंगजेबबद्दलही बऱ्याच गोष्टींची माहिती सर्च केली जात आहे

दरम्यान औरंगजेब आणि बेगम दिलरास बानो यांची सर्वात मोठी मुलगी ज़ेब-उन-निसाबद्दल फारसं कोणाला माहित नाहीये

ज़ेब-उन-निसाला वाचनाची आवड होती. तिने पर्शियन कवी हम्माद सईद अश्रफ मजनधारानी यांच्याकडून साहित्याचे ज्ञान घेतले होते

इतिहासकार असं म्हणतात की, ज़ेब-उन-निसालाने 'मख्फी' या नावाने फारसीमध्ये कविता लिहिल्या आहेत

तसेच इतिहासकारांच्या मते, एकदा ज़ेब-उन-निसा एका कार्यक्रमासाठी बुंदेलखंडला गेली होती

तिथे ज़ेब-उन-निसाला महाराज छत्रसाल दिसले आणि ती त्यांच्या प्रेमात पडली

औरंगजेबाला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने आपल्या मुलीला फटकारलं. अखेर औरंगजेबाने तिला दिल्लीतील सलीमगड किल्ल्यात कैद केलं.

कैदेत असताना तिच्या मनात अचानक कृष्णाप्रती भक्ती निर्माण झाली

ज़ेब-उन-निसाने 20 वर्षांच्या तुरुंगवासात गझल, दोहे आणि अनेक कविता लिहिल्या