छत्रपती संभाजी महाराज कुठे शहीद झाले माहितीये?

19 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली

संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा शत्रू औरंगजेब याच्याविरुद्ध मोहिमांचे नेतृत्व केलं

मराठा साम्राज्यातील गणोजी शिर्के आणि कान्होजी या दोघांच्या फितूरीमुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं

औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याचा आदेश दिला होता.

गणोजी शिर्के आणि कान्होजी यांच्या विश्वासघातानंतर हे घडले असं म्हटलं जातं

1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर बेड्या घालून आणण्यात आलं

संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितला

त्यासाठी औरंगजेबाने संभाजी महाराजांना विविध प्रकारे छळलं

11 मार्च 1689 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. तुळापूर येथील इंद्रायणी आणि भीमा नद्यांच्या संगमावर त्यांची हत्या करण्यात आली

संभाजी महाराज शहीद झाले पण त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही

संभाजी महाराज शहीद झाले पण त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही