मलायका अरोराला हवीये अर्जुन कपूरची मिठी? इंस्टाग्रामवर खास पोस्ट

30 January 2025

Created By : मयुरी सर्जेराव

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा आजही होतात.

ब्रेकअपनंतर दोघांनीही बऱ्याचदा पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.

दोघांच्या ब्रेकअपवर अर्जुनने भाष्य केलं असलं तरी मलायकाने मात्र अजून याबाबच चर्चा केली नाही.

मात्र मलायकाने तिच्या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दोन पेंग्विन मिठी मारताना दिसतात.

‘आयुष्यात कधी कधी आपल्याला फक्त मिठीची गरज असते, शब्द नसतात, सल्ला नसतो, फक्त एक मिठी असते जी तुम्हाला महत्त्वाची वाटते’

या फोटोला असं भावनिक कॅप्शनही मलायकाने दिलं आहे.

मलायकाची ही पोस्ट व्हायरल होत असून तिला अर्जुनची आठवण येत असल्याचा अंदाज नेटकरी लावतायत.