एकता कपूरने अजून लग्न का नाही केलं ?

15 April 2024

Created By : Manasi Mande

प्रसिद्ध दिग्दर्शक-प्रोड्युसर असलेल्या एकता कपूरचा मनोरंजन क्षेत्रात दबदबा आहे.

प्रोफेशनल आयुष्यात खूप यशस्वी झालेली एकता वयाच्या 48 व्या  वर्षी अजूनही अविवाहीत आहे. तिने अजून लग्न केलं नाही.

तिने अजून लग्न का केलं नाही ? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

एका जुन्या मुलाखतीत एकता म्हणाली कि तिच्या जेवढ्या मित्र-मैत्रिणींची लग्न झाली ते आता सिंगल आहेत.

मी अनेक घटस्फोट पाहिलेत, त्यामुळे मी लग्नाची घाई करेन असं वाटत नाही. मला मूल हवंय एवढंच माहीत आहे, लग्नाबद्दल मी काही बोलणार नाही.

माझ्याकडे स्वत:साठीच वेळ नाही. काही तास फ्री मिळाले तर मी स्पामध्ये जाऊन रिलॅक्स करेन, मित्र-मैत्रिणींसोबत फिरेन.

माझं कामावर खूप प्रेम आहे. कामाशिवाय मी कंटाळेन. त्यामुळे बोअर होण्यापेक्षा कामात बिझी राहणं मला जास्त आवडतं.

एकता कपूरने लग्न केलं नसलं तरी ती सिंगल मदर आहे.2019 साली सरोगसीच्या माधम्यातून ती आई बनली. तिच्या मुलाचं नाव रवी आहे.

सध्या एकता तिच्या LSD 2  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 19 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होईल.