बी-टाऊनचे हे स्टार्स आहेत आलिशान रेस्टॉरंटचे मालक...

28 February 2024

Created By : Manasi Mande

अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी हिने नुकतंच मुंबईत आलिशान रेस्टॉरंट उघडलं.

मुंबईतील वांद्रे येथे  गौरीने 'टॉरी' हे रेस्टॉरंट सुरू केलं.

बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींची आलिशान रेस्टॉरंट्स आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि गौरी खानचा जवळचा मित्र करण जोहरचंही यात नाव आहे. 'न्यूमा' नावाने करणचं मुंबईत आलिशान रेस्टॉरंट आहे.

बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही एक बिझनेसवुमन देखील आहे.

शिल्पाच्या मुंबईतील रेस्टॉरंटचं नाव आहे 'बास्टियन'

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत.

धर्मेंद्र यांच्या मालकीचंही एक रेस्टॉरंट असून त्याचं  नाव आहे 'गरम धरम ढाबा'

अभिनेत्री प्रियांका चोप्राचही नाव या लिस्टमध्ये आहे. न्यूयॉर्कमध्ये तिचं 'सोना' नावाचं रेस्टॉरंट आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी तिने रेस्टॉरंटमधील भागीदारी सोडली.