Gvinda : गोविंदाशी डिव्होर्स झाल्यास सुनिता आहुजाला किती मिळणार पोटगी ?
26 February 2025
Created By : Manasi Mande
गोविंदा आणि सुनीता अहुजा यांचं लग्न 11 मार्च 1987साली झालं. मात्र त्यांचं लग्न अनकेदा मोडण्याच्या मार्गावर होतं हे दोघांनीही कबूल केलं होतं.
गोविंदा आणि नीलम यांच्या अफेअरमुळे सुनिताला खूप त्रास झाला होता. आता पुन्हा गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मी आणि गोविंदा एकत्र रहात नाही, असे सुनीताने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
गोविंदा आणि सुनीता यांचा ग्रे डिव्होर्स होत असल्याची चर्चा आहे. लग्नानंतर तब्बल 38 वर्षांनी ते दोघं वेगळे होणार असल्याचे वृत्त आहे.
ग्रे डिव्होर्स हा साधारण घटस्फोटापेक्षा खूप कठीण असतो. ज्याच्यासोबत अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवलं, अनेक सुख-दु:ख झेलली, त्या व्यक्तीपासून माणूस विभक्त होतो.
दांपत्यामधील नातं कसं आहे आणि पैसे किती आहेत, यावरून ग्रे डिव्होर्समध्ये संपत्तीचं वाटप ठरतं. आता विभक्त झाल्यावर गोविंदा सुनीताला किती पैसे देणार हे अजून स्पष्ट झालं नाहीये.
गोविंदा आणि सुनिताची एकूण संपत्ती 300 कोटी आहे. फिल्म्स, ब्रँड एंडॉर्समेंट, रिअल इस्टेटमधील गुंतवणूक याद्वारे गोविंदाची कमाई होते. सुनिता आहुजाही कोट्यावधींची मालक आहे.
गोविंदा हा फिल्म्स शिवाय ब्रँड एंडोर्समेंट, पर्सनल इन्व्हेस्टमेंट यांच्यातून रग्गड कमाई करतो.