शाहरुखचे भाड्याचे घर आणि मन्नत किती वेगळं आहे?
19 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
शाहरुख खानचा बंगला मन्नतचे नूतनीकरण होत आहे, ज्यामुळे तो त्याच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात शिफ्ट झाला आहे
शाहरुखने जॅकी भगनानी आणि त्याच्या कुटुंबाकडून मुंबईतील पाली हिल्स भागात तीन वर्षांसाठी एक डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे
पूजा कासा नावाच्या इमारतीतील हे डुप्लेक्स अपार्टमेंट खूपच आलिशान आहे
मन्नतचे क्षेत्रफळ 27 हजार चौरस फूट आहे, तर त्याने भाड्याने घेतलेल्या घराचे क्षेत्रफळ 10.5 हजार चौरस फूट आहे.
मन्नत हा एक आलिशान बंगला आहे, तर त्याचे भाड्याचे घर डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. शाहरुखने इमारतीत 2 डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केले आहेत.
एक फ्लॅट पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहे, तर दुसरा फ्लॅट सातव्या आणि आठव्या मजल्यावर आहे. किंग खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहणार आहे.
मन्नतमध्ये 6 बेडरूम आहेत, अनेक लिव्हिंग रूमसह, या घरात लायब्ररी आणि ऑडिटोरियमसारख्या सुविधा देखील आहेत.
भाड्याच्या घरात इतक्या सुविधा नाहीत.या घरासाठी शाहरुख दरमहा 24.15 लाख रुपये भाडे देणार आहे. म्हणजे 3 वर्षांत 8.7 कोटी
60 वर्षांचा आमिर एका मुलाची आई असलेल्या गौरीच्या प्रेमात का पडला? स्वत:च सांगितलं कारण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा