'आमच्यासाठी हे...' एक्स गर्लफ्रेंड करीनाला भेटल्यानंतर शाहिद कपूर काय म्हणाला?  पाहा VIDEO

9 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

आयफा अवॉर्ड्समध्ये सध्या चर्चा होतेय ती शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या भेटीची

2007 मध्ये शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर दोघेही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले नाहीत

8 मार्च रोजी आयफा स्टेजवर दोघेही एकत्र दिसले.पाहताच क्षणी दोघांनीही एकमेकांना मिठी मारली

याबाबत शाहिद कपूरची प्रतिक्रियाही समोर आली. आयफाच्या पत्रकार परिषदेत तो याबद्दल बोलला

शाहिद म्हणाला की 'हे आमच्यासाठी नवीन नाही. आज आम्ही स्टेजवर भेटलो आणि आम्ही बऱ्याचदा भेटतो"

त्याने असेही म्हटलं की जर "लोकांना आमचं बोलणं, भेटणं योग्य वाटत असेल तर ते चांगलंच आहे."

करीना आणि शाहिद यांनी 3 वर्ष एकमेकांना डेट केलंय. 'फिदा', 'जब वी मेट', 'चुप चुप के' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

प्रत्येक चित्रपटात दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंत दिली गेली.