CID कार्यक्रमात दयाने किती दरवाजे तोडले? हे आहे उत्तर
3 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
क्राइम थ्रिलर शो सीआयडी लोकांच्या आवडती टीव्ही मालिका आहे. या कार्यक्रमातील सर्व पात्र लोकांच्या आवडीचे आहेत.
सीनियर पोलीस अधिकारी दया हे पात्र सर्वात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात त्याने अनेकदा दरवाजा तोडण्याचं काम केलं आहे. हे पात्र दयानंद शेट्टीने साकारलं आहे.
कायम सीआयडी एसीपी प्रद्युमन दयाला दरवाजा तोडण्याची सूचना देतो. 'दया दरवाजा तोड दो' हा संवाद आता प्रत्येकाच्या तोंडी बसला आहे.
दयाला आपण अनेक वर्षांपासून दरवाजा तोडताना पाहतो. पण कधी विचार केला आहे का, त्याने या कार्यक्रमात किती दरवाजे तोडलेत. याचं उत्तर त्यानेच दिलं आहे.
2024 मध्ये दयाने सांगितलं की, एका चाहत्याने त्याच्यावर स्टडी केली आणि त्याने सांगितलं की पहिल्या सीझनमद्ये 1700-1800 दरवाजे तोडले.
हा आकडा पहिल्या सिझनमधील आहे. हा सिझन 1998 ते 2018 पर्यंत चालाल. 21 डिसेंबर 2024 पासून सीआयडीचा दुसरा सिझन सुरु झाला आहे. दया यातही दरवाजे तोडत आहे.
पहिल्या सिझनप्रमाणे लोकं दुसऱ्या सिझनलाही पसंती देत आहेत. या सिझनमध्ये अनेक ट्वीस्ट अँड टर्न पाहायला मिळत आहेत.
साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?