नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?

10 ऑक्टोबर  2026

Created By:  Sunil Late

नाना पाटेकरांनी १९७९ साली  पहिला मराठी सिनेमा केला.  ज्याचं नाव सिंहासन होतं

१९८० साली त्यांनी भालू चित्रपट केला.  हा चित्रपट एका नाटकावरुन  प्रेरित होता.

त्यानंतर त्यांनी १९८० ते १९८३  या तीन वर्षांमध्ये गड जेजुरी जेजुरी  (१९८०) रघुमैना (१९८३)सावित्री (१९८३) हे तीन मराठी सिनेमे त्यांनी केले.

त्यानंतर १९८६मध्ये त्यांनी  माफीचा साक्षीदार हा  एका सत्य घटनेवर आधारीत  मराठी सिनेमा केला.

त्यानंतर त्यांनी २००५ मध्ये  आलेला  पक पक पकाक हा  सुंदर मराठी सिनेमा केला.

त्यानंतर देऊळ 2011 मध्ये आला ज्यामध्ये,  धर्म, राजकारण आणि  व्यावसायीकरण यावर भाष्य केले होते.

डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रिअल हिरो  हा 2014 साली आलेला डॉ. प्रकाश आमटे  यांच्या जीवनावरील प्रेरणादायी  बायोपिक होता.

नटसम्राट (2016) गाजलेला आणि  लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. त्यानंतर 2018 मध्ये  आपला माणूस, आणि ओले आले 2024 मध्ये  त्यांचा शेवटचा मराठी सिनेमा आला होता.