छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात महाराणी येसूबाई वाघिणीसारखं मुघलांशी लढल्या पण...

19 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

महाराणी येसूबाई कर्तव्यदक्ष, राजकारण कुशल होत्या

त्यांनी 1680 ते 1730 या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचं योगदान दिलं

पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या महाराणी येसूबाई.

अंदाजे इसवी सन 1661 ते 1665 या दरम्यान येसूबाईंचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत झाल्याचं म्हटलं जातं

वयाच्या 6 ते 7 व्या वर्षीच लग्न झाल्यानं त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाई स्वराज्याची धुरा चपखलपणे सांभाळत असत

इ.स. 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज व शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले.

महाराणी येसूबाई स्वतः रायगड लढवत होत्या, पण अखेर मुघलांनी त्यांना कैद केलं

आयुष्याची 27 वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुघलांच्या कैदेत घालवली.

अखेर इ.स. 1719 च्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या.