मुलगी पसंत आहे ! श्वेता तिवारीची लेक भावली, इब्राहिमच्या घरच्यांनी थेट...
7 March 2025
Created By : Manasi Mande
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीप्रमाणेच तिची लेक पलक तिवारीदेखील चर्चेत असते.
पलक बरेच वेळा अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत दिसली आहे. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.
पलक आणि इब्राहिम अली खान बरेचदा लपूनछपून भेटले आहेत, पण कॅमेऱ्याच्या लेन्सपासून वाचू शकले नाहीत. दोघांनी डेटिंगच्या चर्चांवर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
पण हे आता कन्फर्म झालं आहे. नुकतेच पलकने इन्स्टावर काही फोटो शेअर केले. त्यावर इब्राहिमच्या आत्याने, सबा पतौडीने कमेंट केली आहे.
सबा पतौडीने पलकच्या या फोटोंवर रेड हार्ट इमोजी दिली आहे. तर पलकनेही ती कमेंट लाईक केली.
वन शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये पलक अतिशय सुंदर आणि फिट दिसली. इब्राहिमच्या आत्याच्या कमेंटनंतर नेटीझन्सनीही तिला चिडवलं.