कोण आहे 'पाताल लोक 2'चा खतरनाक स्नायपर डॅनियल? पटकावलं होतं 'इंडियन आयडॉल'चं विजेतेपद

23 January 2025

Created By: Swati Vemul

'पाताल लोक'चा दुसरा सिझन अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होतोय

या सिझनमधील नव्या स्टारकास्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सीरिजमधील खतरनाक स्नायपर डॅनियलच्या भूमिकेनं विशेष लक्ष वेधलंय

स्नायपर डॅनियलची भूमिका 'इंडियन आयडॉल 3'चा विजेता प्रशांत तमांगने साकारली आहे

प्रशांत मूळचा दार्जिलिंगचा असून एका दुर्घटनेत वडिलांना गमावल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं

कोलकाता पोलिसांत तो वडिलांच्या जागी कॉन्स्टेबलच्या पदावर रुजू झाला होता

नोकरीसोबतच तो ऑर्केस्ट्रामध्ये गाणीसुद्धा गायचा

2007 मध्ये तो 'इंडियन आयडॉल 3'चा विजेता ठरला होता

2010 मध्ये त्याने नेपाळच्या चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात केली

प्रशांतने 2011 मध्ये नागालँडची एअर होस्टेस गीता थापाशी लग्न केलं, या दोघांना एक मुलगी आहे

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने घेतलं खंडोबाचं दर्शन