जान्हवी कपूरने थेट लग्नाची तारीख केली जाहीर? ती पोस्ट चर्चेत

25 October 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे असते सतत चर्चेत

जान्हवीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्याची सध्या जोरदार चर्चा आहे

'29 ऑक्टोबरची तारीख सेव्ह करा', असं लिहित तिने हार्ट इमोजीसह डान्सिंग गर्ल आणि फ्लाइटचा इमोजी पोस्ट केला

थोड्या वेळाने तिने ही पोस्ट डिलिट केली, परंतु तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले होते

जान्हवीने या तारखेचा उल्लेख केल्याने तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारियाला जान्हवी करतेय डेट

आता या पोस्टमागचा खरा अर्थ जान्हवीच सांगू शकते, परंतु 29 ऑक्टोबरपर्यंत चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल

RRR फेम रामचरण पुन्हा होणार बाबा; पत्नीने दिली 'गुड न्यूज'