जया बच्चन यांनी नात नव्याची केली कानउघडणी

15 February 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री जया बच्चन आणि त्यांची लेक श्वेता बच्चन यांचा स्ट्राँग बाँड आहे.

नव्या नंदा देखील आजीच्या खूप जवळची आहे. What The Hello Navya 2 हा तिचा पॉडकास्ट लोकांना खूप आवडतोय.

नव्याने याच्या तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो इन्स्टावर शेअर केला आहे. त्यामध्ये नव्या, जया बच्चन आणि श्वेता या तिघी स्किन आणि हेअर केअर रूटीनबद्दल बोलल्या. 

त्या व्हिडीओमध्ये श्वेता बच्चनने तिच्या आईची सर्वात बेकार हेअर केअर उपायाबद्दल सांगितलं. केसांना कांद्याचा रस लावणं श्वेताला बिलकूल आवडत नाही.

आई, तू जेव्हा केसांना कांद्याचा रस लावायची ते सगळ्यात खराब होतं, असं श्वेताने आईला सांगितलं.

तिचं बोलणं ऐकून जया बच्चन यांना हसू आवरलं नाही.

श्वेताने सांगितलं की ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे गाढ झोपते. पण नव्या म्हणाली की तिला कधीच चांगली झोप लागत नाही.

कारण तू नेहमी पुढल्या दिवसाची चिंता करत असतेस, मग तुला चांगली झोप कशी येईल, असं सांगत जया बच्चन यांनी नातीची कानउघडणी केली.

श्वेता बच्चनने स्किनकेअर टिप्सही शेअर केल्या. सकाळी उठल्यावर फेसवॉश मग टोनर आणि मॉयश्चरायजर लावत असल्याचं श्वेताने सांगितलं.