ही तर दुसरी जया बच्चन..; भडकलेल्या काजोलला पाहून नेटकऱ्यांची टीका

Created By: Swati Vemul

16 March 2026

अभिनेत्री काजोल तिच्या बेधडक आणि तितक्याच तापट स्वभावासाठी ओळखली जाते

काजोल अनेकदा पापाराझींवर रागवताना, चिडताना दिसते

काजोलने मुंबईतल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती

या शोमधून थकून घरी जाताना चाहत्यांनी तिच्याभोवती घोळका करत सेल्फीची मागणी केली

काजोलने चाहत्यांना थेट नकार दिला आणि त्यांच्यावरच ती चिडताना दिसली

या कार्यक्रमातील काजोलचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी टीका करत आहेत

काजोलला काही नेटकऱ्यांनी थेट 'दुसरी जया बच्चन' असं म्हटलंय

हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे