कतरिना कैफने शेअर केले 'बेस्ट फ्रेंड'च्या लग्नाचे फोटो
8 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
कतरिना कैफने नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावली. आता तिने लग्नाच्या कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले आहेत
कतरिनाच्या मैत्रिणीचे नाव करिश्मा कोहली. 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' सारख्या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
कतरिनासोबत तिची धाकटी बहीण इसाबेल कैफही करिश्माच्या लग्नाला उपस्थित होती.
कतरिना आणि करिश्मा यांची 16 वर्षांपासून मैत्री आहे. कतरिनाने करिश्मासाठी एक सुंदर पोस्टही देखील लिहिली आहे.
कतरिनाने लिहिले, "तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. 16 वर्षांपूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा तुझ्या आनंदाने आणि वेडेपणाने माझे लक्ष वेधून घेतले होतं आणि तेव्हापासून मागे वळून पाहिलं नाही.