25 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली असून त्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील एक जुना फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्या फोटोत तिने दोन वेण्या घातलेल्या दिसत आहेत.
फोटोवर Fergusson College चा शिक्का आहे. या फोटोसोबत तिने भावनिक कॅप्शन लिहित जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हा कोवळा चेहरा पाहताना वाटतं, ही मुलगी कोण आहे? तिची स्वप्नं काय होती? अशा शब्दांत तिने आठवण व्यक्त केली.
तिच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी कमेंट्स आणि हार्ट इमोजीद्वारे प्रेम व्यक्त केले आहे.