१९९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

अभिनेता गोविंदा यांची एक हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात चौकशी होणार आहे.

गोविंदा याचे नाव  पॅन इंडिया ऑनलाइन पॉन्जी स्कॅममध्ये आले आहे.

ओडिशा क्राईम ब्रॅन्च आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून गोविंदा याची चौकशी करण्यात येणार आहे.

पॅन इंडियाच्या घोटाळ्यात सोलर टेक्नो एलायन्सचे नाव आले आहे.

सोलर टेक्ना एलायन्सच्या एका कार्यक्रमास गोविंदा हजर होता. गोव्यातील झालेल्या कार्यक्रमात गोविंदा याने या कंपनीचे प्रमोशन केले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सोलार टेक्ना एलायन्स प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

या घोटाळा प्रकरणात कंपनीचे मालक गुरतेज सिंह सिद्धू आणि निरोध दास यांना अटक केली गेली आहे.