राम जन्मभूमीचे खोदकाम करताना 21 वर्षांपूर्वीचे अवशेष मिळाले आहे. ASI ला मूर्त्या, कळस अन् भांडी मिळाली आहे.
2002 मध्ये खोदकाम करताना भारतीय पुरातत्व विभागाला (ASI) अवशेष मिळाले होते. परंतु ते आता जारी करण्यात आले.
खोदकामात मिळालेले अवशेष जवळपास 50 आहेत. त्यात 8 तुटलेले खांब, 6 खंडीत मुर्त्या, 5-6 मातीची भांडी आहेत.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी हे फोटो जारी केले आहेत. साधू संत यांच्या दाव्यानुसार हे सर्व 500 वर्ष जुने आहे.
21 वर्षांपूर्वी राम मंदिर परिसरात खोदकाम करताना हे अवशेष मिळाले होते. वादग्रस्त जागेत ASI ला हे अवशेष मिळाले होते.
वादग्रस्त जागेवर राम मंदिर होते, हे सिद्ध करण्यासाठी हे अवशेष महत्वाचे ठरले.
राम मंदिरातील रामललाचे दर्शन घेऊन परत निघताना असलेल्या गॅलरीत हे अवशेष सुरक्षित ठेवले आहे.
सध्या राम मंदिराचे काम वेगाने सुरु आहे. जानेवारी 2024 मध्ये भाविकांसाठी मुख्य मंदिर खुले होणार आहे.
मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त पगार घेणार कर्मचारी वाचण्यासाठी येथे क्लिक करा