घराघरातील लाडकी 'पारू' होणार महाराष्ट्राची लाडकी मॉडेल

12 February 2025

Created By: Swati Vemul

महासंगमनंतर ‘पारू’ मालिकेत दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत

नुकतंच या मालिकेने वर्ष पूर्ण केलं, यानिमित्ताने सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं

सेलिब्रेशनचं अजून एक कारण होतं ते म्हणजे घराघरातील आपली लाडकी पारू होणार आहे महाराष्ट्राची लाडकी मॉडेल

पारू पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर होणार आहे

पारू अनुष्काला इशारा देते की "पंधरा दिवसांच्या आत मी तुला किर्लोस्कर घरातून बाहेर फेकून देईन."

इकडे दिशा किर्लोस्कर उद्योग समूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते

अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल

अनुष्का पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते

मात्र पारूच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो

‘पारुला’ पुन्हा एकदा दिमाखात किर्लोस्कर कंपनीची ब्रांड अँबेसेडर बनवण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं

अनुष्काचा खरा चेहरा आता पारू सर्वांसमोर आणणार आहे

अनुष्काचा खरा चेहरा समोर आल्याने पारु आणि अनुष्कामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू झाली

पारू ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठीवाहिनीवर प्रसारित होते.

'हम आपके है कौन'मधली रिटा आता दिसते अशी; ओळखूही शकणार नाही