आयफासाठी किंग खानला रॉयल ट्रिटमेंट, शाहरूखला इतर सेलिब्रिटींपेक्षा आलिशान खोली 

10 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

2.50 लाख भाडे, भिंतींपासून ते उशांपर्यंत सर्व कस्टमाइज, शाहरूखच्या आलिशान सुइटचे फोटो  

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान स्वतःमध्ये एक ब्रँड आहे. शाहरूख आयफा पुरस्कार सोहळ्यात दिसला

सुपरस्टार शाहरुख आयफाचा भाग होण्यासाठी जयपूरला गेला होता. तिथे त्याचं खास स्वागत करण्यात आलं. तो एका आलिशान सुइटमध्ये राहिला होता

रिपोर्टनुसार शाहरुख यावेळी हयात रिजेंसी प्रेसिडेंशियल सूटमध्ये राहत होता. त्याचे भाडे 2.60 लाख रुपये होतं आणि हा सुइट प्रचंड आलिशान आहे

शाहरुख जयपूरला 3 दिवसांच्या मुक्कामासाठी गेला होता. अभिनेत्याचा हा सुइट इटालियन थीमनुसार तयार करण्यात आला होता. 3 बीएचके अपार्टमेंट हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर होते.

या खास सुइटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध होत्या. यामध्ये बेडरूम, ड्रॉईंग रूम आणि मेकअप शेल्फचा समावेश होता. याशिवाय भिंतींवर शाहरुखचे स्केच देखील होते

अभिनेत्याचा हा सुइट प्रत्यक्षात त्याच्यासाठीच बनवण्यात आला होता. त्यातील बहुतेक गोष्टी त्याच्या नावाने कस्टमाइज केलेल्या होत्या.  सुइटचं  इंटीरियर डिझायनिंग अद्भुत होतं

आयफा 2025  पुरस्कार सोहळा देखील खास होता. यावेळी शाहरुख खान खूपच छान अंदाजात दिसला.