'शंभुराज' हे नाव मुद्दाम बदललंय का? होणाऱ्या पतीविषयी प्राजक्ता गायकवाडचा खुलासा

10 August 2025

Created By: Swati Vemul

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडने नुकताच साखरपुडा केला

योगायोग म्हणजे प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचंही नाव 'शंभुराज' असं आहे

या नावाच्या योगायोगाबद्दल प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला

छत्रपती संभाजी महाराज कायम माझ्या हृदयात आहेत आणि राहतील, असं ती म्हणाली

माझे होणारे अहो... त्यांचंही नाव महाराजांच्या नावाला अनुसरूनच आहे, त्यांचं नाव आहे शंभुराज- प्राजक्ता

काहींनी मला विचारलं की मुद्दाम नाव बदललंय का, पण असं काही नाहीये, असं प्राजक्ताने स्पष्ट केलं

माझ्यासाठी हे सर्व खूपच अनपेक्षित होतं, अशा शब्दांत प्राजक्ताने भावना व्यक्त केल्या

प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?