'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताने 'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर सादर केला हवेतला योग

31 January 2025

Created By: Swati Vemul

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार

प्रेक्षकांची लाडकी मुक्ता 'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार

मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेनं तिच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली

सुरुवातीला स्विमिंग आणि योगा असं सत्र चालू असायचं

योगावरच्या याच प्रेमापोटी स्वरदाने म्हैसूर गाठलं आणि महिनाभर अष्टांग योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं

योगाचे नवनवे प्रकार शिकण्याचा जणू स्वरदाला ध्यास लागला आणि पुण्यातील एका संस्थेतून तिने एरियल योग शिकण्याचं ठरवलं

स्वरदाच्या आयुष्यात अभिनयासोबतच योगसाधनेलाही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे

शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ती योगसाधनेसाठी वेळ काढतेच

'आता होऊ दे घिंगाणा'चा हा एपिसोड येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर

'छावा'च्या ट्रेलरमधील 'हा' सीन आता चित्रपटात पहायला मिळणार नाही