सलमानसाठी प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, हात जोडून म्हणाली..

16 April 2024

Created By : Manasi Mande

दबंग स्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला. सगळ्यांना सलमानची चिंता आहे.

सलमानच्या जीवाला धोका असल्याचे पाहून अभिनेत्री राखी सावंतलाही टेन्शन आलंय, कारण ती सलमानला भाऊ मानते.

राखीने व्हिडीओ शेअर करून सलमानच्या हल्लेखोरांना विनंती केली. सलमानला नुकसान पोहोचवू नका, असे तिने म्हटले.

या व्हिडीओमध्ये राखीने हल्लेखोरांसमोर हात जोडले. भाईसोबत असं करू नका, मी तुमच्यासमोर हात जोडते, अशा शब्दांत राखीने विनंती केली.

सलमान लिजंड आहे. त्याने अनेकांचं घर वाचवलं, बऱ्याच लोकांची मदत केली. त्याला त्रास देऊन तुम्हाला काय मिळेल ? असा सवालही राखीने विचारला.

सलमान भाई आणि त्याच्या NGO मुळे अनेकांचं घर चालतं, त्यांच्यासोबत असं करू नका असंही राखीने म्हटलं.

माझ्या आईसाठी त्यांनी बरंच काही केलं. तिच्या ऑपरेशनसाठी  मदत केली. भाईला सोडून द्या अशी विनंती राखीने केली.

 सलमानबद्दल राखीला वाटणारी कळकळ पाहून चाहतेही इंप्रेस झाले.पण ती हे सगळं फक्त पब्लिसिटीसाठी करत आहे, असंही अनेकांना वाटतंय.

 राखी सलमानसाठी रडत्ये, पण तिच्या डोळ्यात अश्रू नाहीत, असे म्हणत काहींनी तिच्यावर टीकाही केली.