बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचा पोलिसांच्या भूमिकेत कडक अंदाज

26 March 2024

Created By : Manasi Mande

'दबंग'मध्ये सलमानने तर 'सिंघम'चित्रपटात अजय देवगणने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

पण हिरोच नव्हे तर बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही मोठ्या पडद्यावर पोलिसांची भूमिका साकारली.

2016 साली आलेल्या 'जय गंगाजल'मध्ये प्रियांका चोप्राने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली.

'मर्दानी' या गाजलेल्या चित्रपटाच्या दोन्ही भागांत राणी मुखर्जी कडक पोलिस ऑफीसर म्हणून शोभून दिसली.

'दृश्यम' चित्रपटाच्या दोन्ही भागांत तब्बू ही इन्स्पेक्टर मीरा देशमुखच्या भूमिकेत होती. तिच्या कामाचं बरंच कौतुक झालं.

सोनाक्षी सिन्हाने 'दहाड'मध्ये एका सब-इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. ही सीरिज ओटीटीवर रीलिज झाली होती.

'समय'मध्ये सुष्मिता सेनने मालविका चौहानची भूमिका साकारली. तिच्या कामाचं, भूमिकेचं खूप कौतुक झालं.

या लिस्टमध्ये हेमा मालिनी यांचंही नाव आहे. 'अंधा कानून'मध्ये त्यांनी इन्स्पेक्टर दुर्गा देवी यांची भूमिका साकारली.