रवीना टंडनचा Air India ने प्रवास; चिडले नेटकरी, म्हणाले 'पेड प्रमोशन'

18 June 2025

Created By: Swati Vemul

अहमदाबाद विमान दुर्घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

अभिनेत्री रवीना टंडनने या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला

इतकंच नव्हे तर विमानात बसल्यानंतर तिने स्वत:चे काही फोटोसुद्धा शेअर केले

विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाने प्रवास करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल तिने लिहिलं

रवीनाने एअर इंडियाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या

रवीनाने लिहिलं, 'एक नवी सुरुवात, अडचणींनंतरही पुन्हा उड्डाण, सर्वकाही पुन्हा नव्याने सुरू करण्याचा दृढनिश्चय आणि स्वत:ला आतून मजबूत बनवण्याचा प्रयत्न'

वातावरण थोडं तणावग्रस्त आहे, पण क्रू मेंबर्सच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, त्यामागे त्यांनी वेदना लपवल्या आहेत- रवीना

प्रवासी, क्रू मेंबर्स.. सर्वजण शांत आहेत, पण काहीही न बोलता ते एकमेकांना आधार देत आहेत- रवीना

ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय, त्यांच्या जखमा कधीही न भरणाऱ्या आहेत- रवीना

एअर इंडियाला कोणत्याही भीतीविना पुन्हा उठून मजबूत होण्यासाठी, नेहमीच पुढे जाण्यासाठी शुभेच्छा- रवीना

रवीनाच्या या पोस्टचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी नाराजी व्यक्त केली

रवीनाने एअर इंडियाचं पेड प्रमोशन केलंय, असा काहींचा आरोप

'क्योंकी सास भी कभी बहु थी' स्टारकास्ट इतकी बदलली; पहा ट्रान्सफॉर्मेशन