'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचे 500 भाग पूर्ण

19 April 2024

Created By: Swati Vemul

या आठवड्यात आपण पाहिलं की नेत्रा अस्तिकाचा वध करते

रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करते

त्याचवेळी नेत्रा त्याच चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार करते

रुपालीचं निधन झालं असं सर्वांना वाटत असतानाच ती उठून बसते आणि विरोचक अमर असल्याचं सर्वांना सांगते

रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळतायत आणि एका वाद्याच्या आवाजाने रुपालीला भंडावून सोडलंय

त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती विरोचकाकडून एका वाद्याची खूण मिळते

विचित्र वीणाच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्त येतं

या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त होते

ही प्राप्त झालेली शक्ती राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका दररोज रात्री 10.30 वाजता झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येते

तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी; बोल्ड अंदाजामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल