सलमानची हिरॉईन लवकरच करणार लग्न ?

30 April 2024

Created By : Manasi Mande

जय हो या सलमानच्या चित्रपटातून डेब्यू करणारी डेझी शाह लवकरच लग्न करणार का ?

रिॲलिटी शो मधून प्रसिद्ध झालेला शिव ठाकरे याच्यासोबत ती रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे बरेचदा एकत्र दिसतात.

दोघे डेट करत आहेत, असं चाहत्यांना वाटतंय. हे कपल लग्न कधी करणार असा प्रश्न अनेक चाहते विचारतात.

नुकत्याच एका मुलाखतीत डेझीने या कथित अफेअरच्या मुद्यावरून मौन सोडले.

शिव आणि तिच्या नात्याचं सत्य डेझीने सांगितलं. तिने अफेअरच्या सगळ्या अफवा फेटाळून लावल्या.

शिव ठाकरेशी लग्न कधी करणार ? असा प्रश्न विचारल्यावर डेझी म्हणाली - मित्रांशी कधी लग्न करतात का  ?

चित्रपटात दाखवतात ते त्यापुरतंच असतं. खऱ्या आयुष्यात असं काही होत नसतं असं डेझीने स्पष्ट केलं.

खतरों के खिलाडी दरम्यान डेझी आणि शिवची ओळख झाली. तेव्हापासूनच ते चांगले मित्र आहेत.

मुलगा असावा तर असा… गर्दीतही अभिषेकने अमिताभ यांना दिली साथ !