मुलगा असावा तर असा.. नेटीझन्स अभिषेकवर खुश

25 April 2024

Created By : Manasi Mande

बॉलिवूडचे शहनेशाह अमिताभ बच्चन यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमिताभ यांना मिळालेला हा सन्मान चाहत्यांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो, असं बिग बी म्हणाले.

या सोहळ्यासाठी अमिताभ यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकही गेला होता.

यावेळी तो त्याच्या वडिलांसोबत खंबीरपणे उभा राहून त्यांना साथ देताना दिसला.

अमिताभ यांना पाहताच खूप गर्दी झाली पण अभिषकेन शांतपणे गर्दी आणि मीडियाला सांभाळलं. पुढे जाऊन त्याने वडिलांसाठी रस्ता बनवला.

त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं. मुलगा असावा तर असा - असं म्हणत चाहत्यांनी त्याचं खूप कौतुक केलं.