कोणाची हिंमत आहे माझ्यासमोर बोलण्याची.. जया बच्चन का भडकल्या ?

29 February 2024

Created By : Manasi Mande

'व्हॉट द हेल नव्या 2' या पॉडकास्टमुळे नव्या नवेली नंदा चर्चेत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये नव्याने जया बच्चन आणि श्वेता बच्चनसह ट्रोल्सबद्दल चर्चा केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सबद्दल जया बच्चन बोलल्या. अतिशय वाईट पद्धतीने लोक एकमेकांची मजा घेतात, खिल्ली उडवतात.  

कमेंट करायचीच असेल तर सकारात्मक लिहा ना. पण लोकांना निगेटीव्ह गोष्टीच लिहायला आवडतात. त्यानंतर नव्याने जया बच्चन यांना महत्वाचा प्रश्न विचारला.

तुमच्यासमोर  कोणाला बसवलं तर ती व्यक्ती काहीच बोलू शकणार नाही, असं नव्या म्हणाली. 'कोणाची हिंमत आहे का तेवढी ?' असं प्रत्युत्तर जया बच्चन यांनी दिलं.   

दुसऱ्यांना होणारा त्रास पाहून लोकं आता खुश होतात, असं श्वेता बच्चन म्हणाली.

आमच्यासोबत असं घडलं नाही, हे बरं आहे, असे लोकांचे विचार झाले आहेत आता. पण हे विचार खूप चुकीचे आहेत.

जया बच्चन त्यांच्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेतच. त्या बऱ्याच वेळा फोटोग्राफर्सनाही फटकावतात.

काही बोलायचंच असेल तर समोर येऊन मोठ्या, महत्वाच्या मुद्यांवर बोला ना, असंही जया बच्चन म्हणाल्या,