नव्याच्या शोमध्ये आजी आणि नातवात जुंपली

23 February 2024

Created By : Manasi Mande

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिचा 'व्हॉट द हेल नव्या  2' हा शो सध्या खूप गाजतोय.

या एपिसोडमध्ये नव्या, श्वेता, जया बच्चन आणि अगस्त्य नंदाही होता.

या शोदरम्यान जया बच्चन यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. डिनरला गेल्यावर महिलांनी पैसे देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली.

असं करणाऱ्या ( पैसे देणाऱ्या) महिला, मुली मूर्ख असतात, असं बेधडक वक्तव्य जया बच्चन यांनी केलं.

त्या महिला किती मूर्ख असतील. नेहमी पुरूषांनीच पैसे दिले पाहिजेत, असंही जया बच्चन शोमध्ये म्हणाल्या.

तुमच्यासाठी एखादी व्यक्ती काही करत असेल तर त्याला ते करू द्यावं. एवढं उदार होण्याची गरज नाही, असंही जया बच्चन यांनी नमूद केलं.

मात्र अगस्त्य हा काही आजीच्या बोलण्याशी सहमत नव्हता. एखादी गोष्ट करताना ती प्रेमाने करावी, असं अगस्त्यचं मत होतं.

तुम्हीच (पुरूष) महत्वाचे आहात हे दाखवण्याची गरज नाही. एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करता आली पाहिजे, असंही तो म्हणाला.