शशी कपूर यांच्या लेकाला पाहिलंत का? सेमटू सेम हॉलिवूडचा हिरो

25 फेब्रुवारी 2025

Created By : मयुरी सर्जेराव

कपूर कुटुंबात जन्मलेल्या सुपरस्टार शशी कपूर यांना दोन मुले आहेत, एक कुणाल आणि दुसरा करण कपूर. 

शशी कपूर यांचा धाकटा मुलगा करण कपूर बराच चर्चेत असून त्याने 1978 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली

'जुनून' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, परंतु हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही.

असे म्हटले जाते की त्याचा चित्रपट यशस्वी न होण्याचं कारण त्याचा वाईट अभिनय नव्हता तर त्याचा लूक होता.

करणची शरीरयष्टी ब्रिटिशांसारखी वाटते, त्याचे केस सोनेरी आणि डोळे निळे आहेत, त्यामुळे लोक त्याला परदेशी मानत.

करणची आई जेनिफर केंडल ही ब्रिटिश वंशाची होती, ज्यांनी 1958 मध्ये शशी कपूर यांच्याशी लग्न केलं.

दोन मुलांव्यतिरिक्त शशी कपूर यांना संजना कपूर ही एक मुलगी देखील आहे.

10 वर्षांच्या कारकिर्दीत करणने 5 हिंदी चित्रपट केले, पण यादरम्यान तो अनेक ब्रिटिश मालिकांमध्येही दिसला

एकामागून एक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर करण कपूरने अभिनयाला अलविदा म्हटलं

62 वर्षीय करणने आता परदेशात फोटोग्राफीमध्ये करिअर केले आहे, ज्याची झलक त्याच्या इंस्टाग्रामवर पाहता येते