कतरिना कैफला महाकुंभात स्वामी चिदानंद सरस्वतींकडून मिळाली खास भेट

24 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

प्रयागराजमधील  महाकुंभमेळ्यात अभिनेत्री कतरिना कैफनेही सोमवारी महाकुंभात स्नान केलं

सोमवारी सकाळी कतरिना कैफ आपल्या सासूसोबत कुंभमेळ्यात पोहोचली

महाकुंभात  कतरिनाने स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांची भेट घेतली

स्वामी चिदानंद सरस्वती यांनी कतरिना आणि तिच्या सासूबाईंचं तिलक लावून आणि हार घालून स्वागत केलं

यावेळी स्वामी चिदानंद सरस्वती यांनी कतरिनाला खास आणि पवित्र भेट दिली

स्वामी चिदानंद सरस्वतींनी कतरिनाला भगवान शिवाची मूर्ती आणि रुद्राक्षाचं रोप भेट म्हणून दिलं

कतरिना अध्यात्माकडे तेवढ्याच आदराने आणि विश्वासाने पाहते हे यावरून दिसून येतं

माध्यमांशी बोलताना कतरिना म्हणाला की, "मी भाग्यवान आहे की मी इथे येऊ शकले. मी खूप आनंदी आहे. मी स्वामीजींना भेटलो,आशीर्वाद घेतले"