कॅन्सरशी जिंकली, पण... सोनाली बेंद्रे हिला भेडसावतेय नवी समस्या

07 May 2024

Created By :  Manasi Mande

 आपल्याला कॅन्सर झालाय हे सोनाली बेंद्रेला 2018 साली समजलं. पण तिने हार न मानता या आजाराशी लढा दिला.

आता सोनाली बरी आहे पण या आजाराचे काही परिणाम शरीरावर झाले असून तिला काही समस्यांचा सामना करावा लागतोय.

केमोथेरपीनंतर त्रास होतोय. स्मरणशक्ती कमकुवत झालीये, असं सोनालीने एका मुलाखतीत नमूद केलं.

हे किती कठीण आहे याची कल्पना नाही. पण सुरूवातीला माझी स्मरणशक्ती खूप चांगली होती.

पानभर संवाद वाचूनही ते लक्षात रहायचे. पण किमोनंतर यातलं काहीच सोपं नाहीये.

 तेच संवाद लक्षात ठेवायला आजकाल मला जास्त वेळ लागतो. हा किमामुळे झालेला परिणाम असू शकतो.

हे नक्की काय आहे, हे का होतंय ते मलाही कळत नाहीये. पण हे सगळंच विचित्र आहे. असं सोनालीने नमूद केलं.

तरीही सोनालीने हार मानलेली नाही, ती पुढेच जात्ये.  मला अभिनय आवडतो आणि कॅमेऱ्यासमोरच रहायचं आहे, हे तिने ठरवलंय.

द ब्रोकन न्यूज 2 सीरीज मधून सोनालीने पुनरागमन केलं. या सीरिजमध्ये तिच्यासोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.