बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी चित्रपटात साकारले डबल रोल (photo : freepik)

20 November 2023

Created By : Manasi Mande

हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी पडद्यावर दुहेरी भूमिका साकारल्या. त्यापैकी अनेक चित्रपट लोकप्रिय झाले.

मौसम चित्रपटात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी डबल रोल केला होता.

त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले.

श्रीदेवी यांचा आयकॉनिक चालबाज चित्रपटही सर्वांच्याच लक्षात असेल.

या चित्रपटात त्यांनी अंजू आणि मंजू या दोघींची भूमिका साकारली.  

दीपिका पडूकोण हिने पदार्पणातील, पहिल्याच चित्रपटात, ओम शांती ओम मध्ये दुहेरी भूमिका केली.

काजोल हिने दुश्मन चित्रपट जुळ्या बहिणींची भूमिका साकारली.

हेमा मालिनी यांचा सदाबहार, सीता और गीता हा चित्रपट तर सर्वांनाच आठवत असेल.

हेमा मालिनी यांनी यामध्ये सीता आणि गीता या दोघींचीही भूमिका साकारली.

माधुरी दीक्षित हिनेही दुहेरी भूमिका साकारली आहे. संगीत चित्रपटात तिने आई आणि मुलगी अशा दोन्ही भूमिका केल्या.

तनु वेड्स मनु रिटर्न्स चित्रपटात कंगना रनौतने डबल रोल साकारला.