एअर इंडिया अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला अभिनेत्रीने म्हटलं खोटारडा; अखेर मागावी लागली माफी
20 June 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीला एअर इंडिया विमान दुर्घटनेबद्दल एक ट्विट करणं पडलं महागात
विमान अपघातात वाचलेल्या एकुलत्या एक प्रवाशाला सुचित्राने म्हटलं होतं खोटं
विश्वास कुमार रमेश खोटं बोलत असल्याचं ट्विट सुचित्राने केलं होतं
यावरून नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केल्यानंतर अखेर सुचित्राला मागावी लागली माफी
विश्वास कुमार रमेश यांनी एअर इंडियाच्या त्या विमानातून प्रवास केल्याबद्दल आणि जीव वाचल्याबद्दल खोटं सांगितलं?- सुचित्रा
हे खरोखरच विचित्र आहे. युकेमधील त्यांच्या कुटुंबाने याची पुष्टी केली नाही का? त्यांच्या भावाच्या अंत्यसंस्काराबद्दल काय, जिथे तो त्याच्या पार्थिवाला खांदा देताना दिसला होता?- सुचित्रा
जर हे खरं असेल तर विश्वास कुमार रमेश यांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना मानसिक रुग्णालयात पाठवलं पाहिजे- सुचित्रा